शाळेचा इतिहास वा वाटचाल

महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले नगर जिल्ह्यातील मतमाऊली तीर्थस्थान हरेगाव हे बालगोपाला पासून ते वृद्धापर्यंत सर्वाना परिचित आहे . अशा या पवित्र भूमी मध्ये सन १९२२ पासून इ १ ली ते ७वी पर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राथमिक मराठी शाळा कार्यरत आहे.अनेक वर्षापासून हायस्कूलच्या पुढील शिक्षणासाठी विध्यार्थ्याना ज्ञानमाता विद्यालय संगमनेर येथे जावे लागत असे. अनेक वर्षापासूनची पालकांची मागणी लक्षात घेवून अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची समस्या ओळखून तत्कालीन महागुरुस्वामी रा .रेंव्ह .व्हलेरीयन डिसूझा यांनी रेंव्ह फा.नेल्सन मच्याडो यांची नेमणूक केली. कणखर नेतृत्व व नेत्र दीपक कर्तुत्व असणाऱ्या फा.नेल्सन यांनी सरकार दरबारी पाठपुरावा करून उत्कर्षम ही जीवनम हे ध्येय मनात बाळगून ४ ऑगस्ट १९८० साली संत तेरेजा बॉईज हायस्कूल स्थापन केले व .हायस्कूलचे पहिले प्राचार्य व संस्थापक म्हणून त्यांची नोंद झाली. विश्वविख्यात नोबेल पारितोषिक विजेत्या संत मदर तेरेजा यांना हरेगाव तीर्थाक्षेत्रात पाचारण करून त्यांचा संदेश ऐकण्याचा व प्रत्यक्ष दर्शन घडवून आणण्याचा योग फा.नेल्सन यांनीच घडवून आणला ते पुना एजुकेशन सोसायटी या संस्थेचे सचिव होते. त्या नंतर रें.फा.ब्लेस बोधक यांनी शाळेची धुरा सांभाळली. त्यांच्या काळात शाळेचा इयत्ता १०वी चा उत्कृष्ट निकाल लावण्यात ते यशस्वी झाले त्याच प्रमाणे जिल्हा पातळी विविध स्पधेत विध्यार्थ्यांना सहभागी केले त्यांच्याच कार्यकाळात शाळेला अनुदान प्राप्त झाले तद्नंतर तत्कालीन महागुरुस्वामी स्व. थोमस भालेराव यांनी स्व. रें. फा. ब्लेस यांच्याकडे पी.जे.एस. संस्था अहमदनगर या संस्थेचे सचिव पद सुपूर्त करण्यात आले.

तदनंतर स्व. मा.फा.वसंत सोनवणे यांची मुख्याध्यापक पदी नेमणूक झाली होती .त्यांनी आपल्या शिस्त प्रिय, कणखर, करारी ,कडक गुणानी व विद्यालयाला श्रीरामपुर तालुक्यात श्रेष्ठ स्थान मिळवून दिले.त्यांनी व स्व. रें.फा.रवी त्रिभुवन यांनी संगणक खोली ग्रंथालय व शिक्षक स्टाफरूम व ११ वी १२ वी चे वर्ग खोल्या बांधून मुळ इमारतीत आणखी भर घातली सन १९९६ पासून संगणक वर्ग तयार करण्यात आले त्यांनी क्रीडा स्पर्धेसाठी राज्यपातळीवर खेळाडू पाठवले. त्यांच्याच कारकीर्दीत संत तेरेजा बॉईज हायस्कूलचे रुपांतर संत तेरेजा उच्च माध्यमिक विद्यालयात झाले .त्यानतर रें.फा.गिल्बर्ट यांची प्राचार्य म्हणून नेमणूक करण्यात आली त्यांच्या कालावधीत श्रीरामपुर तालुक्यात संत तेरेजा उच्च माध्यमिक विद्यालय निकालात प्रथम येण्याचा मान मिळाला. त्याच प्रमाणे ते पी.जे.एस.संस्थेच्या सचिव पदावर होते त्यानंतर रें.फा.लोंढे यांची प्राचार्य म्हणून नेमणूक करण्यात आली त्यानी आपल्या शैक्षणिक कारकीर्दीत सन २०१३-१४ मध्ये विज्ञान शाखेची सुरुवात केली याच काळात शाळेला शासकीय संगणक प्रयोग शाळा शासनाच्या अनुदानातून प्राप्त झाली. कालांतराने त्यांची संस्थेचे सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली

मा.रा.रें.डॉमनिक रोझारिओ हे सन२०१७ पासून संकुलाचे प्राचार्य व संचालक म्हणून कार्यभार आजपर्यंत सांभाळत आहे

सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात विद्यालयास भारत सरकारच्या शाळासिद्धी उपक्रमा अंतर्गत अ श्रेणी मिळाली

आमच्या विद्यालयातून आजपर्यंत सुसंस्कृत, आदर्श नागरिक ,डॉक्टर्स, वकील, इंजिनीयर. मुख्याध्यापक ,आदर्श शिक्षक ,सैनिक वीर, कलाकार घडविले आहे .त्याच प्रमाणे आध्यत्मिक कार्यासाठी अनेक धर्मगुरु धर्मभगिन ख्रिस्त मळ्यात सेवाभावी जीवन जगात आहे व अनेक विध्यार्थी समर्पित जीवनाच्या मार्ग वर मार्गक्रमण करत आहे

विद्यालयाने विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक विकास होण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर विज्ञान प्रदर्शनात नेत्र दीपक यश मिळवले आहे विद्यालयाचा शैक्षणिक विकास करण्यासाठी विविध मंडळे कार्यरत आहे विध्यार्थी व विद्यलायाच्या विकासात मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग ,स्थानिक धर्मगुरू व सर्व धर्म भगिनी यांचा सक्रीय सहभाग आहे .प्रजा जागृती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रा. रेव्ह.लुर्डस ड्यनीयल यांचे मोलाचे सहकार्य व आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी आहे